एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: आता राज्यभरातील 'शाखा'ही शिंदेंकडे जाणार? जाणून घ्या काय आहे पुढील रणनीती

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पक्षांतर्गत बांधणीला लवकरच सुरुवात होताना पहायला मिळणार आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे (shinde group) आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाकडून पक्षांतर्गत बांधणीला लवकरच सुरुवात होताना पाहिला मिळणार आहे. शिवाय पक्षाच्या म्हणून ज्या काही बाबी आहेत, त्यावर देखील लवकरच हक्क सांगण्यात येणारं आहे. त्यामुळे आता शिवसेनेची (Shiv Sena) ताकद असणाऱ्या शाखा कुणाकडे जाणार? शिवाय शिंदे गटाची पुढील रणनीती काय असणार आहे? याबाबतच्या शक्यता जाणून घेणार आहोत.

निवडणूक आयोगातील लढाई शिंदे गटाकडून (shinde group) जिंकल्यानंतर आता पक्ष बांधणी आणि पक्षाचा असणाऱ्या सर्व बाबींवर हक्क शिंदे गटाकडून सांगण्यात येणार आहे. शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच्या नावे असल्यामुळे शिंदे गटाकडे ते जाणार नसले तरी मुंबईतील शाखांचा प्रश्न मात्र अजून बाकी आहे मुंबईत 227 वॉर्डमध्ये शिवसेनेच्या शाखा असून काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन शाखा आहेत. यातील काही शाखा अनधिकृत देखील आहेत, तर बहुतेक शाखा शिवाई ट्रस्टच्या नावे आहेत. ज्या ट्रस्टच्या नावे नाहीत, त्या जुन्या शिवसैनिकांच्या नावावर आहेत 

शिवाई ट्रस्टच स्वरूप

1) लीलाधर ढाके - अध्यक्ष

2) रवींद्र मिरलेकर- सदस्य 

3) अरविंद सावंत- सदस्य

4) विशाखा राऊत-सदस्य

5) सुभाष देसाई- सदस्य

5) दिवाकर रावते- सदस्य

आणि नव्याने नुकतच अॅड करण्यात आलेलं नाव म्हणजे

7) उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav balasaheb thackeray) 

सध्या अचानक उद्धव ठाकरे यांच नावं अॅड करण्यात आल्यामुळे कुठं तरी राज्यांतील सध्याचा सत्तासंघर्ष आणि पक्षाची झालेली स्थिती हे तर कारण तर नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विरोधकांनी देखील यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.

शिंदे गटाकडून विधान भवनातील कार्यालयं ताब्यात घेण्यात आल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शाखांचं काय? हा प्रश्न अनुत्तरीत होताच. मात्र सूत्राच्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखा ठाणे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आपोआपच त्या शिंदे गटाच्या ताब्यात राहणार आहेत. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी लवकरात लवकर कार्यकारणी बोलवण्यात येणार असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील.

कोणते निर्णय घेतले जातील

1) मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होईल.

2) महत्वाचे नेते सचिव ठरवतील.

3) आगामी काळात एबी फॉर्मवर सह्या कुणाच्या असतील याचा निर्णय होईल.

4) ठाकरेसोबत असलेल्या आमदारांना व्हीप बजावण्यासाठी पत्र देण्यात येईल.

5) घराघरात पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून मात्र याबाबत चुप्पी साधली जात असली, तरी शिंदे गटाकडून मात्र शाखांची माहिती गोळा करायला सुरुवात झाली आहे. एकदा माहिती एकत्रच झाली की, त्या शाखा ताब्यात घेण्यात देखील सुरुवात होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Embed widget