(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : वास्तू जशीच्या तशी उभी करु, केशवराव भोसले नाट्यगृहाला 20 कोटींचा निधी जाहीर, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Eknath Shinde, कोल्हापूर : "कोल्हापूरकरांच्या भावना या नाट्यगृहाशी किती खोलवर जोडल्या आहेत याची आपल्याला पूर्ण कल्पना असून शहराचे हे वैभव पुर्नस्थापित करणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य आहे.
Eknath Shinde, कोल्हापूर : "कोल्हापूरकरांच्या भावना या नाट्यगृहाशी किती खोलवर जोडल्या आहेत याची आपल्याला पूर्ण कल्पना असून शहराचे हे वैभव पुर्नस्थापित करणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शासनाकडून 20 कोटी रुपये आणि 5 कोटी विम्याचे असे एकूण 25 कोटी रुपये देऊन ही वास्तू पुन्हा एकदा होती तशीच उभी करू", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदेंनी नाट्यगृहाला भेट दिली आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकार उपस्थित होते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात खासबाग आणि नाट्यगृहाची निर्मिती झाली
एकनाथ शिंदे म्हणाले, ही वास्तू जसे ज्या तसे उभा करू. हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करू. केशवराव भोसले यांच्या जयंती दिवशी ही घटना झाली हे दुर्दैवी आहे. नाट्यगृह अनेक असतात मात्र काही नाट्यगृह असतात ज्यांच्याशी कलावंताचे आणि श्रोत्यांची भावना जोडलेली असते. कोल्हापूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्याही आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात खासबाग आणि नाट्यगृहाची निर्मिती झाली. अशा वस्तू पुन्हा होणे नाही. असंख्य कलाकारांचे या नाट्यगृहाची भावनिक संबंध आहेत. झालेली घटना ही वेदनादायी आहे.
कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला गुरुवारी भीषण आग लागली होती . कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली होती. हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली होती. केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळ जवळच असल्याने हीच आग पुढे नाट्यगृहात शिरली. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक