Eknath Shinde on Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या प्रवेशामुळे शिंदे गटावर चारी बाजूंनी टीकेची झोड, आता एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Eknath Shinde : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांच्यावर शिवसेनेच्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
Eknath Shinde on Shrikant Pangarkar : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांच्यावर शिवसेनेच्या संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. शिंदेच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश पार पडला होता. मात्र, गौरी लंकेश हत्येप्रकरणातील आरोपीला संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिल्याने चारुबाजूंनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका झाली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. "शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे जर कोणते पद देण्यात आले असेल तर त्या पद नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे".
गद्दारांना आरोपींची साथ!
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 20, 2024
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये संशयित असलेले श्रीकांत पांगारकरने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात केलेला प्रवेश म्हणजे 'उंदराला मांजर साक्ष' असा प्रकार आहे.
श्रीकांत पांगारकरने तीन संशयित हिंदुत्ववादी…
श्रीकांत पांगारकर यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती
अर्जुन खोतकर याच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला होता
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत पांगारकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता
पांगारकर हे तीन वर्षापासून या प्रकरणात तुरुंगात होते
जालना विधानसभा प्रमुख पदी पांगारकर यांची नियुक्ती करण्यात आली होती
पत्रकार गौरी लंकेश यांनी 2017 मध्ये हत्या
पत्रकार गौरी लंकेश यांची 2017 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणात श्रीकांत पांगरकर याने 3 वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता. दरम्यान, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. श्रीकांत पांगारकर याने जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, सर्व बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर त्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या