Eknath Shinde on Jayant Patil : “मविआतील स्पर्धेत जयंतराव सर्वात पुढे”, एकनाथ शिंदेंच्या जयंत पाटलांना कोपरखळ्या
Eknath Shinde on Jayant Patil, Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. महाविकास आघाडीतील स्पर्धेत जयंत पाटील सर्वात पुढे आहेत.
Eknath Shinde on Jayant Patil, Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. महाविकास आघाडीतील स्पर्धेत जयंत पाटील (Jayant Patil) सर्वात पुढे आहेत. त्यामुळेच नाना पटोल फिल्डवर जाऊ लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांना लगावलाय. शिवाय, जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या, असंही शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या आहेत
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नेरेटिव्ह पसरवलं. त्यामुळे आम्ही कमी पडलो. महाविकास आघाडीने संविधान बदलणार म्हणून जनतेचा मनात गैरसमज निर्माण केला. मात्र, तुमच्या फेक नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या आहेत. अजित पवार यांनी क्रांतीकारी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमार्फत राज्यातील माता भगिणींना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जनता आता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जनतेला द्यायचं म्हटलं की, विरोधकांच्या पोटात का दुखतं?
चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं. बाळासाहेब नेहमी सांगायचे चांगल्याला चांगलं म्हणा. चुकत असेल तिथे सूचना करा. परंतु चांगल्या चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलं असं माझ्या ऐकिवात नाही. बिनबुडाची टीका आपण टाळली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणजे महायुतीच्या भावंडांकडून माताभगिनींना आहेर आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 46 हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार आहे. याबाबत विरोधकांना आनंद व्हायला पाहिजे होता. मात्र, जनतेला द्यायचं म्हटलं की, विरोधकांच्या पोटात का दुखतं? हे मला समजलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
# Live📡| 02-07-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 2, 2024
📍विधान भवन, मुंबई
📹 राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन, दिवस पाचवा- विधानसभेतून लाईव्ह
https://t.co/dBaqfPpgqQ
इतर महत्वाच्या बातम्या