Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"
Bhavana Gawali on Eknath Shinde : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मला मागच्या वेळेस लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही."
Bhavana Gawali on Eknath Shinde : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मला मागच्या वेळेस लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामध्ये विविध कारणे असतील. काही कारणे असतील, असं राजकारणामध्ये असतं, पण आज शिंदे साहेब माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. लाडकी बहिण योजना सरकारने राबवली. तसं मी म्हणेन की, मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण आहे", असे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) म्हणाल्या. विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सर्वांच्या सहकार्याने विधानपरिषद गाजवणार, भावना गवळी कडाडल्या
भावना गवळी म्हणाल्या, विधानपरिषदेचे सभागृह माझ्यासाठी नवीन आहे. मी लोकसभेवर अनेक वेळा निवडून गेले. त्यामुळे लोकसभेचे सभागृह अनेक वर्ष पाहिलेलं आहे. विधानपरिषद नवीन जरी असली, तरी सर्वांच्या सहकार्याने गाजवणार आहे.
लोकसभेला तिकीट कापलं, विधानपरिषदेला उमेदवारी
भावना गवळी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. भावना गवळी यांना उमेदवारी न देता राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र, ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी राजश्री पाटील यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, भावना गवळींचे तिकीट कापण्यात आल्यानंतर भाजपच्या दबावामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, असंही विरोधी पक्षाकडून म्हटलं गेलं होतं. मात्र, भावना गवळींना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेंनी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.
भावना गवळी आणि कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी
राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कृपाल तुमाने आणि भावना गवळी या माजी खासदारांना रिंगणात उतरवलय. भावना गवळींना विधानपरिषदेवर संधी दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला फायदा होणार असल्याची चर्चा आहे.
सलग पाच वेळेस खासदार शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंची साथ सोडली
भावना गवळी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आल्या. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळींनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर नरेंद्र मोदींनीही भावना गवळींना राखी बांधली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आजपासून ऑफलाईन अर्ज; पात्र, अपात्रतेचे निकष काय?