एक्स्प्लोर

मोठी बातमी : होय, मी भाजपमध्ये जातोय, एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला माहिती!

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा आजच प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई: एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची घरवापसी होणार असून लवकरच ते भाजप प्रवेश करणार आहेत . आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल. 

मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रोहिणी खडसे काय करणार? 

एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. 

पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीला एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे दोघेही उपस्थित होते. मात्र शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याच्या समितीमध्ये या दोघांच्याही नावाचा समावेश नव्हता. आता हा योगायोग होता की आधीच ठरलं होतं यावरही चर्चा सुरू आहे. 

जळगावात भाजपला फायदा होणार

एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलणार आहेत. या भागात भाजप पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येणार आहे.

रक्षा खडसेंच्या उमेदवारीसाठी हे सर्वकाही? 

भाजपकडून सुरूवातीलपासून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. त्यामुळेच आपण राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र एकनाथ खडसेंनी तब्येतीचं कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीसाठी हा राजकीय डाव टाकला होता का अशी चर्चा आता होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र जळगावातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मात्र त्याला सातत्याने नकार दिला होता. मात्र आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची माहिती समोर आल्याने गिरीश महाजन काय करणार हे पाहावं लागेल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget