एक्स्प्लोर

Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांची माझ्याबद्दलची नाराजी दूर, एकनाथ खडसेंचं वक्तव्य

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही.. विरोध नव्हता, त्यांचे नाराजीचे सूर होते, असे एकनाथ खडसे म्हणाले.

नागपूर: लवकरच भाजपमध्ये (BJP)  ज्यांचा प्रवेश होणार आहे, त्या एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांबद्दल (Devendra Fadnavis)  मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस, महाजन आणि गुलाबराव पाटलांचा माझ्या भाजप प्रवेशाला विरोध नाही, त्यांची नाराजी आता दूर झाली आहे असं खडसे म्हणाले. माझा भाजपमध्ये प्रवेश होणार हे खुद्द विनोद तावडेंनी घोषित केल्यामुळे मी निश्चिंत आहे असं खडसे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

एकनाथ  खडसे म्हणाले,   मी भाजपमध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावेच लागेल. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे तावडे यांनी सांगितले आहे, म्हणून मी निश्चिंत आहे. दरम्यान, माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही  मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे.

नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे : एकनाथ खडसे

भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की नाथाभाऊ यांचा भाजप प्रवेश होईल, म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे.   मी भाजप मध्ये येणार या मुद्द्यावर काही लोकांची नाराजी होतीच, एवढे वर्ष सोबत काम केले होते, म्हणून सर्व गुणगान करतील असे होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर (पक्ष प्रवेश) होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे. भाजपमध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावेच लागेल. पक्षाच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेऊ. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही.. विरोध नव्हता, त्यांचे नाराजीचे सूर होते. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा काम करणार: एकनाथ खडसे

एकनाथ खडसे म्हणाले, भाजपमध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते.  मात्र त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहील असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे, तिला तिथे भविष्य दिसतोय,म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा काम करणार आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही.  मी अजून ही पाच वर्ष परिषदेचा आमदार आहे. पवारांनी सांगितले आहे आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही.

निवडणूक लढवण्याकडे कल नाही: एकनाथ खडसे

मी राजकीय माणूस, मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात पुढे काही ही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या. रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सुचित केले होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहे, या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवत आहे, मी जोडीला मदत करत आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

Eknath Khadse Video:

हे ही वाचा :

राम मंदिर, भ्रष्टाचार, कश्मिरी पंडित, मोदी- शहांवर हल्लाबोल, वाचा उद्धव ठाकरेंच्या बेधडक मुलाखतीतील 21 मुद्दे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget