एक्स्प्लोर

केंद्र सरकारच्या दबावात येऊ नका, उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत पोलीस महासंचालकांना सुनावले

Ajit Pawar On Director General of Police Rajneesh Seth: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना मंचावर असलेल्या राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

Ajit Pawar On Director General of Police Rajneesh Seth:  नागपूर पोलीस भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना मंचावर असलेल्या राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

नागपूर पोलीस भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना मंचावर असलेल्या राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे का होईना पोलीस विरोधकांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप करत पोलीस महासंचालकांना सुनावले. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, रजनीश सेठ माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, काम करत असताना हा कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाचा व्यक्ती आहे. ती विरोधी पक्षाची व्यक्ती आहे. मात्र, केंद्रांमध्ये ते सत्तेवर आहेत, असे कुठलेही दबाव अधिकाऱ्यांनी आणू नये. काम निष्पक्ष पद्धतीने झाले पाहिजे. त्यामध्ये राजकीय दबाव असता कामा नये असे अजित पवार म्हणाले.

अजित दादा एवढ्यावरच थांबले नाही तर, मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो आहे की, पोलिसांवर राजकीय दबाव नसला पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे योग्य पद्धतीने तपास करण्याची मुभा असली पाहिजे. नाहीतर तो माझा आहे, जरा दुर्लक्ष कर, आता तो सापडला आहे. तर त्याचा कामच कर.. हे असलं काही होता कामा नये, असे अजित पवार म्हणाले. लक्षात ठेवा शेवटी आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार आहोत. महाराष्ट्र पोलिसांची परंपरा फार वेगळी आहे. नाव लौकिक वेगळे आहे. देशातलं उत्कृष्ट पोलीस दल असा महाराष्ट्र पोलिसांचा नाव आहे आणि  महाराष्ट्र पोलिसांनी वेळोवेळी ते सिद्ध ही केले आहे. त्यामुळे अशा वेळेस आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता. कुठल्याही आमिषाला बळी न पडता. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. 

रजनीश सेठ आणि दिलीप राव तुम्ही दोघे जेव्हा-केव्हा माझ्याकडे कुठले ही काम घेऊन येता. त्यावेळेस ताबडतोड तुमची प्रत्येक गोष्ट मंजूर करण्याचे काम आम्ही करतो. आमची ही अडचण असतेच मात्र पोलिसांचे काम केलेच पाहिजे असे आमचे धोरण आहे. त्यामुळे पोलिसानी ही कोणाच्या दबावात काम करू नये, असे अजित दादांनी थेट पोलीस महासंचालकांना सुनावले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरें
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरें
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Embed widget