एक्स्प्लोर

Dharmveer Movie trailer: धर्मवीर 2 चा ट्रेलर रिलीज, एकनाथ शिंदेंनी एका दगडात अनेक पक्षी मारले, उद्धव ठाकरेंना डिवचणारे 5 डायलॉग

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी धर्मवीर-2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शिवसेनेचे फायरब्रँड नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असला तरी या चित्रपटातून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय इमेजला झळाळी मिळाली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'धर्मवीर' या मराठी चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात धर्मवीर 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमधील अनेक संवाद हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचणारे असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण, धर्मवीर 2 च्या (Dharmaveer 2) ट्रेलरमधून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेलरमधून सत्तेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तरही देण्यात आले आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

'धर्मवीर-2'या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.  

चित्रपटात उद्धव ठाकरेंना डिवचणार कोणते डायलॉग?

* छत्रपती शिवरायाचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कोणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग

* काय आहे हिंदुत्त्व, अरे 18 पगड जातीच्या लोकांनी एकमेकांना करु करुन मारलेल्या मिठीत आहे हिंदुत्व

* आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली, तर दुसरे कोणी येऊन ती उतरवतील

* सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी एक फॅमिली का कुत्ता नही

* नेता स्वत:च्या घरात घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा

* 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेलाय

View this post on Instagram
 
A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

इतर बातम्या

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?

ट्विंकल खन्ना 50 व्या वर्षी प्रेग्नेंट? अक्षय कुमार पुन्हा बाबा होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Embed widget