एक्स्प्लोर

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?

Aishwarya-Abhishek Divorce : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. ग्रे घटस्फोट म्हणजे काय, ते जाणून घ्या.

मुंबई : मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात मतभेद असल्याचं बोलंल जात असून त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील बिघडलेल्या नात्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट चर्चेचा मुद्दा बनला आहे.

बच्चन कुटुंबापासून ऐश्वर्या रायचे अंतर

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रायचं अभिषेकसह बच्चन कुटुंबात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याचे अनेक पुरावेही वारंवार समोर येत आहेत, जे त्यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याची साक्ष देतात. मागील काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या असता ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिषेक बच्चनने लाईक केली घटस्फोटाची पोस्ट

अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. अभिषेकने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लाईक केली, ज्यामुळे ऐश्वर्या आणि त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. अभिषेकने घटस्फोटाशी संबंधित एक पोस्ट लाइक केली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की 'घटस्फोट कुणासाठीही कधीच सोपा नसतो.'

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांचं नातं

अलीकडेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं, पण सून ऐश्वर्या रायनं सासरच्या मंडळींसोबत पार्टीत प्रवेश केला नाही. या लग्नात ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत एन्ट्री घेतली. या पार्टीमध्ये ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासोबत एकही फोटो क्लिक केला नाही. यावरुनच ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबाचं पटत नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

'जेव्हा प्रेम करणं आता सोपं नाही' 

अंबानी कुटुंबाच्या लग्नानंतर अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली अभिषेकने लाईक केलेल्या पोस्टच्या फोटोमध्ये लिहिलं होतं, प्रेम करणं आता सोपं नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, घटस्फोट घेणं कोणासाठीही सोपं नाही. आनंदाने जगण्याचं स्वप्न कोण पाहत नाही? पण कधी-कधी जीवनात असं काही घडतं ज्याची आपल्याला अपेक्षा नसते. 

या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, जेव्हा लोक अनेक दशके एकत्र राहतात, तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग एकत्र घालवला, कारण दोघेही छोट्या-छोट्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. ते नातं तोडण्यासाठी कशामुळे प्रवृत्त होतं आणि त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. ही पोस्ट 'ग्रे घटस्फोट' किंवा 'सिल्व्हर स्प्लिटर' बद्दल आहे. हीच पोस्ट अभिषेक बच्चनने लाईक केली होती. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकचा ग्रे घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. ग्रे घटस्फोट म्हणजे काय, ते जाणून घ्या.

ग्रे घटस्फोट म्हणजे काय? 

आज जगभरात अशाप्रकारच्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. यामागची कारणे वेगवेगळी आहेत. ग्रे घटस्फोट म्हणजे लग्नाच्या 50 वर्षानंतर होणारा घटस्फोट. अनेकदा दीर्घकालीन संसारात राहिल्यानंतर जोडपं विभक्त होतं. ही जोडपी अनेक वर्षे किंवा दशके विवाहित असतात, पण शेवटी ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'ऐश्वर्याला माझ्या परवानगीची गरज नाही', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनचं जुनं ट्वीट व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAnjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करुAnil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तरABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Embed widget