Dhananjay Munde Resign: रावाचा रंक कसा झाला? बलाढ्य धनंजय मुंडेंना 'या' आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला, पाहा A टू Z माहिती
Dhananjay Munde Resign: गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.

Dhananjay Munde Resign: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज (4 मार्च) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. (Dhananjay Munde Resign Marathi News)
पुढील आरोपामुळे धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेला आणि शेवटी राजीनामा आला-
- वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते.
- धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित असलेले आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील पुरावे अंजली दमानिया यांनी माध्यमांना दिले.
- व्यंकटेश्वरा या साखर कारखान्यात मुंडे कराड यांची भागीदारी
- मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरूनच लाडकी बहीण योजनेच्या समितीवर कराडची अध्यक्ष म्हणून निवड
- पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पाने हालत नाही असा उल्लेख करणे
- 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात अशा घटना केवळ बीड जिल्ह्यातच घडतात का? असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला होता
- आरोप असताना देखील 15 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांची मंत्री पदावर वर्णी लागली..
- वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून सरेंडर होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
- सरेंडर होत असताना व्हीआयपी गाडीमधून सीआयडी ऑफिसमध्ये सोडले
- वाल्मिक कराडच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती आणि त्याचे कनेक्शन मंत्री मुंडे यांच्याशी
- धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्री पद आणि मंत्रीपद भाड्याने दिले होते सुरेश धस यांचा गंभीर आरोप
- कृषी विभागातील बदली घोटाळ्यात वाल्मिक कराड यांच्याकडूनच प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यात पुराव्यासह सुरेश धस यांनी मांडले
- त्या नंतर धनंजय मुंडे यांना स्वपक्षीयातूनच विरोध दर्शविण्यात आला यात प्रामुख्याने प्रकाश सोळंके यांनी राजीनामाची मागणी केली होती.
- खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी कायम ठेवली..
- करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मीक कराड यांनी मारहाण केली असा आरोप
- करुणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेले गंभीर आरोप.
- परळी मधील अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचे यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचा धनंजय मुंडे यांच्याकडे निशाणा राख वाळू माफिया
- बीड मधील पोलीस दलाचे वाल्मिक कराड याच्या संदर्भातील संबंध आणि त्यावरून बीडच्या पोलीस दलाचा आका कोन आरोप
- कृषी विभागातील 300 कोटीच्या खरेदी घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
- पिक विम्यातील घोटाळ्यात परळी हब असल्याचा विरोधकांचा आरोप.
- परळी मधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी पकडण्यात व राजकीय दबाव असल्याचा मुंडे कुटुंबाचा आरोप
- परळी मधील जमीन खरेदीमध्ये सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप.
- हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव.
- खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या शासकीय सातपुडा बंगल्यावर पवनचक्की कंपनीची बैठक.
- विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण व उमेदवाराला धक्काबुक्की..
- धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपामुळे धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेला आणि अखेर 4 मार्च रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
























