Dhananjay Munde-Karuna Sharma: करुणा शर्मांसह मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी; कोर्टाचा आदेश, दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब
Dhananjay Munde-Karuna Sharma: धनंजय मुंडेंची याचिका फेटाळात कोर्टानं करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब केलं.

Dhananjay Munde-Karuna Sharma मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते, असा निर्वाळा मुंबईतल्या माझगाव कोर्टानं दिला आहे. कोर्टानं शनिवारी दिलेल्या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दोन मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळायला पात्र असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळात कोर्टानं करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
माझागाव कोर्टाच्या आदेशात काय काय?
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते - माझगाव कोर्ट
त्यांनी 2 मुलांना जन्म दिलाय हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, माझगांव सत्र न्यायालयाचं निरीक्षण
धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं ओढलेत तीव्र ताशेरे
करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळलं...
आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा होता धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य
त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र, कोर्टाचा निर्वाळा
करुणा शर्मा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटलेलं आहे...
करुणा शर्मा यांचे धक्कादायक आरोप
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. यात त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला. आपल्याला मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरॉईनची ऑफर होती असं करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पहायला मिळालं.























