Karuna Sharma : करुणा शर्मांचा सर्वात मोठा डाव, धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र बाहेर काढलं, स्वत:च पहिली पत्नी, चार मुलांचा उल्लेख!
Karuna Sharma Vs Dhananjay Munde : करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे मृत्यपत्र कोर्टात सादर केलं असून ते ग्राह्य धरून त्या आधारे निकाल द्यावा अशी मागणी केली आहे.

मुंबई : करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर करण्यात आलं आहे. त्यामध्ये चार मुलांच्या नावाचाही उल्लेख आहे. सादर करण्यात आलेलं मृत्यूपत्र हे खरं असल्याचा दावा करत ते ग्राह्य धरण्यात यावा अशी मागणी करुणा शर्मा यांच्यावतीने करण्यात आला आहे. ते हे मृत्यूपत्र खोटं असून त्यामध्ये वेगवेगळ्या सह्या असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांचे अंतिम मृत्यपत्र करुणा शर्मा यांच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आलं. त्यामध्ये करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा उल्लेख आहे. तसेच धनंजय मुंडे याच्या चार मुलांचाही त्यामध्ये उल्लेख आहे. या आधारे कोर्टाने निकाल द्यावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. तर करुणा मुंडे यांनी सादर केलेले मृत्यूपत्र हे खोटं असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे.
करुणा शर्मांकडून कोर्टात लग्नाची कागदपत्रं सादर
दरम्यान करुणा शर्मा यांच्याकडून कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करण्यात आले. मात्र हे सर्व पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले. त्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रं खोटी आहेत असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. मृत्यूपत्र आणि त्याच्या स्वीकृतीपत्रावर धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत, काही ठिकाणी अंगठा लावला आहे असं अॅड. सायली सावंत यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं. तसंच करूणा शर्मांचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा दावा वकिलांनी केला. धनंजय मुंडे यांचं रेशनकार्ड इंदूरमध्ये कसं काय असू शकतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
करुणा शर्मांचे खळबळजनक आरोप
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. यात त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला.
आपल्याला मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरॉईनची ऑफर होती असं करुणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
ही बातमी वाचा:























