'हे दारू विकणाऱ्यांचे सरकार', देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे दारू विकणाऱ्यांचे सरकार असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे दारू विकणाऱ्यांचे सरकार असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर केला आहे. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पापही याच सरकारने केले, असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. फडणवीस सध्या भंडारा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ''कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. हे सरकार एवढ्यावर न थांबता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू 50 टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला. त्यांमुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे.'' असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या सभेप्रमाणे बोनसबाबत सरकारची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधत, ''रोज संविधान खतरे में म्हणतात, मात्र धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना बोलत नाही.'' अश्या परखड शब्दात सुनविले आहे. हे सरकार रोज शेतकऱ्यांची विज कापत असून आम्ही 5 वर्षात एकही विज न कापल्याच्या दाखला यावेळी फडणवीसांनी दिला आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणावर भाष्य करताना फडणवीसांनी मविआ सरकारवर आरोप केला आहे की, ''ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे.'' सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती 14 महिन्याच्या कालावधीत उलटून सुद्धा तयार न केल्याने महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत हे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. या सरकारमध्ये 50 ओबीसी विरोधी मंत्री आसल्याची परखट टीका फडणवीसांनी केली आहे. तर ''आमच्या काळात हलबा समाजाला संरक्षण दिले गेले होते, या सरकारने हलबा संरक्षण न दिल्याने हलबा समाजाचे आरक्षणही धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- विचित्र अपघात... गाडी रिव्हर्स घेताना ताबा सुटला अन् तीन मित्रांना चिरडलं
- Omicron : देशात ओमायक्रॉनचं वाढतं संकट, बाधितांची संख्या 145 वर
- Good Bye 2021 : Squid Game सह 'या' कोरियन वेब सीरिजने गाजवलं वर्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha