एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीत तुम्ही किती जागा जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी किमान जागांचा आकडा सांगितला

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री असताना मी जो अजेंडा चालवत होतो तो आताही उपमुख्यमंत्री असताना चालवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला पूर्णपणे सहकार्य करतात, असे फडणवीसांनी सांगितले.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानच नाही, असे मी म्हणणार नाही. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये (Loksabha Election 2024) आम्ही जितक्या जागा जिंकल्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत. आम्ही गेलो तर पुढेच जाऊ पण आमचा महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा आकडा खाली येणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानं नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. आम्ही गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोनवेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

मी सध्या उपमुख्यमंत्री असलो तरी मला हवा तो अजेंडा चालवू शकतो: फडणवीस

प्रत्येक सरकारची एक काम करण्याची पद्धत असते. पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी माझे अधिकार आणि काम करण्याची क्षमता वेगळी असते. आता मी उपमुख्यमंत्री असलो तरी पूर्वी जो अजेंडा चालवत होतो, तोच चालवू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही मी हातात घेतलेल्या कामाला सहकार्य करतात. माझे अधिकार उपमुख्यमंत्र्यांचे आहेत पण मी मला हवे ते काम करु शकतो, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

...आणि मी मुख्यमंत्र्याचा विरोधी पक्षनेता झालो; फडणवीसांना सांगितला तो किस्सा

देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याशी झालेल्या राजकीय वाटाघाटींचा प्रसंग पुन्हा एकदा सांगितला. त्यावेळी आम्ही शरद पवार यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी युतीसाठी होकार दिला होता. शरद पवार यांनी नंतर अजित पवारांना वाटाघाटीसाठी बोलावले. अजित पवारांसोबत बोलणी फायनल झाली, त्याला शरद पवारांनी मंजुरी दिली. पण सवयीनुसार शरद पवार शेवटच्या क्षणी मागे हटले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मला पुढे करुन तुम्ही सगळं ठरवलं आणि आता ऐनवेळी मागे हटताय, हे अजित पवारांना आवडले नाही. मी भाजपशी विश्वासघात करु शकत नाही, असे त्यांनी शरद पवारांना सांगितले आणि ते आमच्यासोबत आले. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनाही आमच्यासोबत यायचे होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ती युती टिकवता आली नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री पदावरुन विरोधी पक्षनेता झालो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न; पायलट का बदलले? विमानाचे ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न; पायलट का बदलले? विमानाचे ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
EPFO: आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?
पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
Embed widget