Devendra Fadnavis and Congress Party : महाशक्तीच्या बळकटीसाठी फडणवीसांची जोरदार फिल्डिंग, दीड महिन्यात 7 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली
Devendra Fadnavis and Congress Party : काँग्रेसला (Congress Party) सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Devendra Fadnavis and Congress Party : काँग्रेसला (Congress Party) सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा रोल महत्त्वाचा ठरतोय. गेल्या दीड महिन्यांपासून 7 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये आयुष्याची 50 वर्षे काँग्रेसमध्ये घालवलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. जाणून घेऊयात कोण कोणत्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना फळ मिळालं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. तरिही वयाच्या 65 व्या त्यांनी काँग्रेस सोडली.
जळगावचे माजी खासदार उल्हास पाटील भाजपात दाखल
जळगावचे माजी खासदार उल्हास पाटील यांनीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवाय त्यांच्या कन्या केतकी पाटीलही काँग्रेस सोडून भाजपवासी झाल्या आहेत.
माजी गृहमंत्री मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनेचा भाजपात प्रवेश
10 व्या लोकसभेचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनीही काँग्रेस पक्षाची साथ सोडली आहे. शिवाय, देशमुख कुटुंबातील व्यक्तीविरुद्ध त्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात आहे.
बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.
नामदेव उसेंडी यांचा काँग्रेसला रामराम
गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नामदेव उसेंडी नाराज झाले. त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
पद्माकर वळवी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
कॉंग्रेस नेते पद्माकर दळवी यांनी देखील काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी क्रीडामंत्री पदाचा भार सांभाळला होता. मात्र, अलिकडेच त्यांनी भारतीय जनता पक्ष जॉईन करण्याचा निर्णय घेतला.
अमर राजूरकर यांचीही भाजपात एंट्री
अमर राजूरकर माजी विधानपरिषद सदस्य आहेत. शिवाय ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थकही मानले जायचे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर राजूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या