एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे

माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला. या घटनेला 5 ते 6  महिने होऊनही भाजपनं माझा प्रवेश झाल्याचं घोषित केलं नाही. अजून मी वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही.  त्यामुळे  यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारलीय असंही खडसे म्हणालेत. 

 मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  मला  राज्यपालपदाची ऑफर  दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.  फडणवीसांनी मनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं.  फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.  दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं  देखील एकनाथ खडसेंनी "माझा कट्टा" कार्यक्रमात सांगितलंय.  

एकनाथ खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे.  पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे.  

भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर  फुली : एकनाथ खडसे

ज्या वेळेस मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्या कालखंडामध्ये माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती.  दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत मी असताना  जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला.  यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या.  त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला. या घटनेला 5 ते 6  महिने होऊनही भाजपनं माझा प्रवेश झाल्याचं घोषित केलं नाही. अजून मी वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही.  त्यामुळे  यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारलीय असंही खडसे म्हणालेत. 

भाजपमध्ये  मला प्रवेश द्या ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद : एकनाथ खडसे

मी प्रवेश घेतो असं कधी म्हणालो नव्हतो. मला प्रवेश घ्या असे म्हणाले होते. त्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी चर्चा करुन गेलो होतो. 40 वर्षे भाजपचे काम केले.इतके वर्ष काम केले, पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतकं सगळ करून भाजपमध्ये  मला प्रवेश द्या ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget