एक्स्प्लोर

Prajwal Revanna : ड्रायव्हरसोबत भांडण, मोलकरीणचे शोषण आणि हजारो व्हिडीओ असलेला पेन ड्राईव्ह; प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल असं उघडकीस आलं

Deve Gowda Grandson Prajwal Revanna Sex Scandal:  कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडलच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. प्रज्ज्वल रेवण्णा सध्या जर्मनीमध्ये असल्याची माहिती आहे. 

बंगळुरू: कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेडीएसने त्यांना निलंबित केले आहे. सध्या प्रज्ज्वल रेवण्णा भारतातून फरार झाले असून ते जर्मनीत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी प्रज्ज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

प्रज्ज्वल रेवण्णा हे एनडीएचे हसनमधील उमेदवार असून त्यांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत आहेत, त्यामध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहेत. सिद्धरामय्या सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्हिडीओ बनवणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी हा देशातील सर्वात मोठा 'सेक्स स्कँडल' असल्याचे म्हटलं आहे. 

सेक्स स्कँडल कसं उघडकीस आलं? 

गेल्या वर्षी 1 जून रोजी प्रज्ज्वल रेवण्णा यांनी बेंगळुरू सिव्हिल कोर्टात केस दाखल केली होती. हा खटला 86 मीडिया आउटलेट्स आणि तीन व्यक्तींविरुद्ध होता. यामध्ये त्यांनी आपल्या विरोधात फेक न्यूज दिल्याचा आरोप करत व्हिडीओचा प्रसार रोखण्याची मागणी केली होती. 2 जून 2023 रोजी दिवाणी न्यायालयाने त्यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. 

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या प्रकरणात पक्षकार बनलेल्या तीन व्यक्तींमध्ये प्रज्ज्वल रेवण्णाच्या माजी ड्रायव्हरचेही नाव होते. त्या ड्रायव्हरने मार्च 2023 मध्येच नोकरी सोडली. अनेक वर्षे तो येथे काम करत होता.

ड्रायव्हरला कुटुंबातील सदस्यासारखे वागवले जात होते आणि प्रज्ज्वल रेवन्नाचे फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्याच्याकडे होती असा अंदाज आहे. गेल्या वर्षी प्रज्ज्वल रेवण्णासोबत त्याचे भांडण झाले तेव्हा त्याने त्याला व्हिडीओवरून धमक्या देण्यास सुरुवात केली.

भाजपच्या नेत्याची गेल्या वर्षीच वरिष्ठांकडे तक्रार

कर्नाटकचे भाजप नेते देवराज गौडा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक पत्र लिहिले होते. हे पत्र कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र आणि गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णा आणि देवेगौडा कुटुंबीय बेकायदेशीर कामात सहभागी असल्याचा दावा केला होता. 

देवराज गौडा यांनी त्यांच्या पत्रात दावा केला होता की, त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात एकूण 2,976 व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ कथितरित्या प्रज्ज्वल रेवण्णाने शूट केले होते. या व्हिडीओमध्ये काही महिला अधिकारीही दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्हिडीओंचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून लैंगिक कृत्यांमध्ये गुंतवण्यासाठी केला जात आहे. 

देवराज गौडा यांनी आपल्या पत्रात त्यांनी असेही म्हटले होते की, व्हिडीओ आणि कागदपत्रे असलेला आणखी एक पेन ड्राइव्ह काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांना लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएचा उमेदवार बनवल्यास काँग्रेस त्याचा शस्त्र म्हणून वापर करेल असा इशारा त्यांनी दिला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget