Dada Bhuse Bharat Gogawale: गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, दादा भुसे यांना....
Dada Bhuse Bharat Gogawale: पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
Dada Bhuse Bharat Gogawale: महायुतीमधील पालकमंत्री पदावरुन वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली.
दादा भुसे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार- अजय बोरस्ते
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी दादा भुसे यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. दादा भुसे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे. नाशिकसाठी लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळेल. सब्र का फल मिठा होता है...मंत्री दादा भुसे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असं अजय बोरस्ते यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
2. ठाणे - एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे
4. पुणे - अजित पवार
5. बीड - अजित पवार
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन (स्थगिती देण्यात आली)
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी - उदय सामंत
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके
21. सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे (स्थगिती देण्यात आली)
23. लातूर - शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25. सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे
32. अकोला - आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर
36. परभणी - मेघना बोर्डिकर