एक्स्प्लोर

aditi tatkare and girish mahajan : भरत गोगावलेंच्या समर्थकांनी आवाज काढताच महायुतीतील लाडक्या बहिणीचं पालकमंत्रिपद गेलं, गिरीश महाजनांनाही मोठा झटका

aditi tatkare and girish mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे.

aditi tatkare and girish mahajan, Mumbai : महायुतीने सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास तीन महिने पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर शनिवारी (दि.18) प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची यादी राज्य सरकराने जाहीर केली. मात्र, यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. एका दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 

आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांचं पालकमंत्रिपद गेलं

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद रिक्त राहणार आहे. मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते. दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर दोन जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 

राज्य सरकारने आदेशात काय म्हटलंय?  

संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या "नाशिक" आणि "रायगड" या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे.

3. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शनिवारी जाहीर करण्यात आलेली संपूर्ण यादी 

1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
2. ठाणे - एकनाथ शिंदे 
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 
4. पुणे - अजित पवार 
5. बीड - अजित पवार 
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन (स्थगिती देण्यात आली)
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार  तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा 
16. रत्नागिरी - उदय सामंत 
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके 
21.सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे (स्थगिती देण्यात आली)
23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले 
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25.सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे 
32. अकोला - आकाश फुंडकर 
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर 
36.परभणी - मेघना बोर्डिकर

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Guardian minister appointment Canceled : दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, नाशिक आणि रायगडमधील चुरशीने महायुतीचा वाद चव्हाट्यावर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget