काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस असतानाच राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर, कार्यकर्ते संभ्रमात..
Rahul Gandhi UK Visit: गुजरातमध्ये काँग्रेसला बसलेल्या धक्क्यादरम्यान पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी लंडनला रवाना झाले आहेत.
Rahul Gandhi UK Visit: गुजरातमध्ये काँग्रेसला बसलेल्या धक्क्यादरम्यान पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी लंडनला रवाना झाले आहेत. येथे ते 23 मे रोजी आयडियाज ऑफ इंडिया परिषदेला संबोधित करतील. त्यांचा येथील भारतीय समुदायाला भेटण्याचा कार्यक्रमही आहे. काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख आणि पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 23 मे रोजी केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी 'इंडिया अॅट 75' कार्यक्रमाला संबोधित करतील. तसेच आयडियाज ऑफ इंडियाचे शुक्रवारी लंडनमध्ये लॉन्चिंग केले जाईल.
राहुल गांधी गुरुवारी सायंकाळपर्यंत लंडनला पोहोचतील. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि प्रियांक खरगेही उपस्थित राहणार आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासाबाबत परिस्थिती सामान्य झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू असतानाच राहुल गांधी लंडला रवाना झाले आहेत. हार्दिक पटेलने गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, अलीकडेच काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संवाद साधला होता. मात्र त्यांनी पक्षाच्या समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारली होती. तसेच नुकतेच काँग्रेसने उदयपूर, राजस्थान येथे चिंतन शिविराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला होता. अशातच गुजरात आणि पंजाबमध्ये पक्षात फूट पडत असताना राहुल गांधी विदेश दौऱ्यावर गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Special Report : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 50 मजली इमारतीएवढा उंच
BJP Meeting in Rajasthan: काँग्रेसच्या शिबिरानंतर आता भाजप कार्यकारिणीची राजस्थानमध्ये बैठक, 'या' मुद्यांवर होणार चर्चा
GST Council : जीएसटी परिषदेच्या शिफारसी मान्य करण्यास सरकार बांधिल नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा