एक्स्प्लोर

Basavraj Patil: मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार, बसवराज पाटलांचा राजीनामा, दोन दिवसांत भाजपमध्ये जाणार

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार, आणखी एका निष्ठावंताचा पक्षाला रामराम, दोन दिवसांत भाजपमध्ये जाणार. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडणार आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या दोन दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

कोण आहेत बसवराज पाटील?

बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत. राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेसचे निष्ठावंत असून औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.  2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये ते औसा येथून विजयी झाले होते. काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिले होते. मात्र, २०१९ मध्ये  अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये काहीसे साईडलाईन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आता बसवराज पाटील यांनी भाजपची वाट धरल्याचे सांगितले जाते.

लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा, जोरदार प्रचार

बसवराज पाटील यांना गेल्या बऱ्याच काळापासून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आहेत. यासाठी त्यांनी फार पूर्वीपासूनच प्रचारही सुरु केला आहे. बसवराज पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या जागावाटपात धाराशिवची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला मिळू शकते. बसवराज पाटील यांना पक्षात आणून त्यांना धाराशिवमधून उमेदवारी द्यायची असल्यास भाजपला इतर एखाद्या जागेच्या बदल्यात ही जागा पदरात पाडून घ्यावी लागेल. परंतु, भाजपमध्येच या जागेसाठी अनेकजण इच्छूक आहेत. यामध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि बसवराज मंगरुळे यांचा समावेश आहे. 

अशावेळी पर्याय म्हणून बसवराज पाटील यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारीही ठेवली आहे. औसा मतदरासंघात लिंगायत समाज मोठ्याप्रमाणावर असल्याने बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे. परंतु, फडणवीसांचे विश्वासू असलेल्या अभिमन्यू पवार यांना डावलून बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळणे, अवघड मानले जात आहे.

आणखी वाचा

ती एक गोष्ट घडल्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडतील, याचा अंदाज आला होता: शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Embed widget