एक्स्प्लोर

DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी

DCM Sunetra Pawar: सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बारामती: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांनी 'सहयोग' या निवासस्थानी 'जनता दरबार' आयोजित केला होता. या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या. विशेषतः 'लाडक्या बहिणीं'च्या अडचणी सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.(DCM Sunetra Pawar)

प्रश्नांचा निपटारा आणि नागरिकांची गर्दी

सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती तालुक्यातील विविध गावांतील लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अडचणी, स्थानिक नागरी समस्या आणि इतर वैयक्तिक तक्रारी महिलांनी वहिनींसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे संयमाने ऐकून घेत, सुनेत्रावहिनींनी उपस्थित अधिकाऱ्यांना हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश दिले.(DCM Sunetra Pawar)

यावेळी बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनीही सुनेत्रावहिनींची भेट घेऊन व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा केली. सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या तातडीने सोडवल्या जात असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.(DCM Sunetra Pawar)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या 'मानाची गदा' पूजली

जनता दरबाराच्या दरम्यान, पुण्यातील वाघोली येथे आयोजित होणाऱ्या आगामी 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. स्पर्धेचे रीतसर निमंत्रण देण्यासाठी आयोजक बारामतीत आले होते.

यावेळी सुनेत्रावहिनींच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. "कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. अशा प्रतिष्ठित स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते," अशा भावना व्यक्त करत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी आयोजकांना दिले.(DCM Sunetra Pawar)

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : भाजपने तुषार भोसले हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय? रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
भाजपने तुषार भोसले हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय? रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
पंढरपूरचा पुढचा आमदार हा एकनाथ शिंदेंच्या विचारांचाच असणार, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भालकेंचा भाजपला टोला 
पंढरपूरचा पुढचा आमदार हा एकनाथ शिंदेंच्या विचारांचाच असणार, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भालकेंचा भाजपला टोला 
Ajit Pawar : शंभुराज देसाईंसाठी 40 आमदार एकवटले, पण दादांसाठी एकही आमदार आला नाही; अमोल मिटकरींची खंत, ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा
शंभुराज देसाईंसाठी 40 आमदार एकवटले, पण दादांसाठी एकही आमदार आला नाही; अमोल मिटकरींची खंत, ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा
Ranveer Singh RSS: धुरंधर रणवीर सिंह अचानक नागपूरला पोहोचला, सरसंघचालक मोहन भागवतांसोबत रेशीम बागेत गुप्तभेट, नक्की काय घडलं?
धुरंधर रणवीर सिंह अचानक नागपूरला पोहोचला, सरसंघचालक मोहन भागवतांसोबत रेशीम बागेत गुप्तभेट, नक्की काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Embed widget