(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभेसाठी शिंदेंनी कंबर कसली; 46 प्रभारी, 93 निरीक्षकांची नियुक्ती, किती जागांवर असणार लक्ष?
Shiv Sena Shinde Group : महायुतीत सध्या जागावाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. आगामी विधानसभेत शिवसेना शिंदे गट 100 जगांसाठी आग्रही असेल, अशी माहिती मिळत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानपरिषद (Legislative Council Elections) निवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024 Updates) कंबर कसली आहे. अद्याप निवडणुकांची (Election 2024) घोषणा झालेली नाही, पण तरिदेखील जागावाटपावरुन सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सक्रिय झाले आहेत. महायुतीत (Mahayuti) सध्या जागावाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. दरम्यान, आगामी विधानसभेत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) 100 जगांसाठी आग्रही असेल, अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं (Shiv Sena) शनिवारी 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही शिंदे यांनी मित्रपक्षांना विशेषतः भाजपला दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून शिंदे यांनी आपल्या नेत्यांची फौज तयारीसाठी उतरवली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी बोलताना नारायण राणे यांनी भाजपनं आगामी निवडणूक एकट्यानं सर्वच्या सर्व 288 जागांवर लढावी, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीत शिंदेंची मुंबईवर नजर
जो मुंबईचा गड राखतो, तिच आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर बसते, असं राज्याच्या राजकारणात म्हटलं जातं. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीनं मुंबईवर लक्ष केंद्रीय करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून आता शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. एक शिंदेंचा आणि दुसरा ठाकरेंचा. लोकसभा निवडणुकीत तर मुंबईकरांचा कौल ठाकरेंना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता विधानसभेत मुंबईकर कोणाच्या बाजूनं उभे राहणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अशातच आता शिंदेंनीही मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीय केलं आहे.
मुंबईतील 18 जागांसाठी शिंदेंकडून प्रभारींची निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 36 पैकी 18 जागांसाठी निवडणूक प्रभारींची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये माजी नगरसेवक कमलेश राय (चांदिवली, कलिना), मिलिंद देवरा (वरळी, शिवडी), यशवंत जाधव (भायखळा), रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, परभणी, गंगाखेड), राहुल शेवाळे (चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारवी), शिशिर शिंदे (भांडुप पश्चिम, कुर्ला, विक्रोळी, मानखुर्द) यांचा समावेश आहे. तसेच, नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेल्या संजय निरुपम (अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागाठाणे) यांच्याकडेही प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. यावरुन एकंदरीत शिंदेंनी ठाकरेंकडून मुंबईचा गड हिसकावून घेण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबईत शिवसेनेची मूळं खूप खोलवर रुजली आहेत. याचाच फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत होणार आहे. पक्षफुटीनंतर कोर्टातील लढाईल शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना मिळालं. त्यामुळे आता पक्षबांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीनं शिंदे गटानं हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. पक्ष मजबूत करण्यासोबतच निवडणुकीत विरोधकांचे डावपेच उधळून लावण्याची जबाबदारी शिंदेंनी या नेत्यांवर सोपवली आहे.