Amol Kolhe on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, आता खासदार अमोल कोल्हे म्हणतात....
Amol Kolhe on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. या कृतीची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
Amol Kolhe on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी संतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप डोक्यावर परिधान करण्याची विनंती केली. मात्र, जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप नम्रपणे नाकारल्यानंतर त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवरून एक पोस्ट जारी केला आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जिरेटोप नम्रपणे नाकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता अमोल कोल्हे यांनी देखील 'एक्स'वर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2025
रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे!#Maharashtra #Alandi #SantSamvad pic.twitter.com/BBGNMOzW9i
ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह : अमोल कोल्हे
अमोल कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला. ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 4, 2025
राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला… pic.twitter.com/BHE2SAWkuz
आणखी वाचा