एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश

Devendra Fadnavis: परभणीतील हिंसाचारासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य. जातीयवादी आंदोलनाच्या माध्यमातून टार्गेट करणाऱ्यांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर.

नागपूर: राज्यातील जातीयवादी आंदोलनांच्या माध्यमातून मला टार्गेट करणाऱ्यांना निवडणुकीतून उत्तर मिळाले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. परभणीत एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुर्दैवाने उद्रेक झाला. मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणे योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना मंजूर झाले नसते. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. कुठल्याही परिस्थितीत संविधानापेक्षा तसूभरही वेगळं काम आम्ही करणार नाही. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील हिंसाचाराबाबत (Parbhani Violence) बोलातना यासंदर्भात भाष्य केले.

राज्यातील मराठा आंदोलन, परभणीतील उद्रेक अशा जातीयवादी आंदोलनातून तुम्हाला टार्गेट केले जाते, असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना  फडणवीस यांनी म्हटले की, मला टार्गेट करण्याच्या संदर्भात जो विषय त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलंय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. परभणी हिंसाचार प्रकरणात सगळी कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांना सांगितलं आहे की, आकसबुद्धीने कारवाई करु नका. पण कोम्बिंग ऑपरेशन करु नका. पण जे लोक कॅमेऱ्यात लाठ्याकाठ्या  घेऊन तोडफोड करताना आणि दगड मारताना दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात काय कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बीड जिल्ह्यात एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यासंदर्भात काही लोकांवर कारवाई झाली आहे, काहींना निलंबित करण्यात आले आहे, काही लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी 3 आरोपींना पकडले आहे, 4 आरोपींचा शोध सुरु आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले असून चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. आम्ही सगळी चौकशी करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत आरोपी कोणीही असो, कुठल्याचा आरोपीला सोडलं जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्याने घेतल्या जातात आणि जातील. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचे काम करु, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आणखी वाचा

आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion Special Report : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 45% यंग ब्रिगेडSpecial Report Opposition Party Vs Mahayuti : विरोधकांचा सरकारवर आरोप, चहापानावर बहिष्कारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Embed widget