(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra Wagh : चित्रा वाघ यांची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नितीन देशमुख यांची विक्रोळी कन्नमवार नगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार ही तक्रार दाखल केली आहे.
सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत उल्लेख
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियात शरद पवार आणि काही राजकीय नेते आणि पत्रकार यांच्याविरोधात शेअर केलेल्या एका चित्रावरून देशमुख यांची तक्रार केली आहे. या चित्रामुळे शरद पवार यांच्या सोबतच मनोज जरांगे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांची चित्रा वाघ यांनी बदनामी केली असून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. चित्रा वाघ यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली आहे.
एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात
चित्रा वाघ यांनी शरद पवारांसह राजकीय नेते आणि पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे कॅप्शन लिहिताना चित्रा वाघ यांनी लिहिले की, "एक छान कार्टून पाहण्यात आले. ज्याने काढले, त्याच्या कल्पकतेला सलाम! महाराष्ट्राचे पक्षीमित्र ! एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात !"
इतर महत्वाच्या बातम्या
Parinay Phuke on Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा, पुन्हा तुरुंगात टाकावं : परिणय फुके