एक्स्प्लोर

Suraj Chavan Vs Chhaava: छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?

NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, सूरज चव्हाणला माफी नाही; छावा संघटनेची डरकाळी. सूरज चव्हाणांना वॉर्निंग, प्रत्युत्तर देण्याचा इशारा

NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: 'राज्यातील जनतेला वाटतंय की, आमदार माजले आहेत. लोक आपल्या शिव्या घालत आहेत', अशा भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज दिल्यानंतरही सत्ताधारी गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीत तसूभरही फरक पडला नसल्याचे रविवारी लातूरमध्ये (Latur News) दिसून आले. काल लातूरमध्ये अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले होते. यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या (Chhaava organisation) विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी जातीने या सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांनी अगदी कोपर आणि बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यानंतर छावाच्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी विजयकुमार पाटील यांच्याशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला. तेव्हा त्यांनी सूरज चव्हाण यांनी आपल्याला कशाप्रकारे मारहाण केली, याचा वृत्तांत कथन केला.

मला छातीत दुखायला लागलं आहे. त्यांनी माझ्या छातीत आणि पाठीत बेदम मारहाण केली. माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली आहे. मला समोरची व्यक्ती डबल दिसत आहे. उद्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये काय येतंय बघू, असे विजयकुमार पाटील यांनी सांगितले. विजयकुमार पाटील हे एका खोलीत सोफ्यावर बसले होते. त्यावेळी सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हे  त्यांच्यावर तुटून पडले होते. त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना यथेच्छ मारहाण केली होती. यावरुन छावा संघटना प्रचंड आक्रमक झाली असून सोमवारी लातूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

आमचे पदाधिकारी विजयकुमार पाटील हे निवेदन देण्यासाठी सुनील तटकरेंकडे गेले होते. ते निवेदन देऊन एका रुममध्ये बसले होते. त्यावेळी सूरज चव्हाण याच्यासह आलेल्या लोकांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. छावा ही शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे. आमचे पदाधिकारी सुनील तटकरे यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय घेऊन गेले होते. विधानभवनात गेम खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात. या हरामखोर लोकांवर कारवाई झाली पाहिजे. छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, सूरज चव्हाणला माफी नाही. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर ठरवून हल्ला झाला. अजित पवार यांनी याप्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सूरज चव्हाण याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी छावाचे केंद्रीय अध्यक्ष जावळे यांनी केली.

आणखी वाचा

दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Embed widget