एक्स्प्लोर

Suhas Kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून दिंडोरी तुतारीचा जोरदार प्रचार? सुहास कांदेंकडून पुरावे सादर

Suhas Kande on Chhagan Bhujbal, Dindori Loksabha : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande ) यांनी केला होता.

Suhas Kande on Chhagan Bhujbal, Dindori Loksabha : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande ) यांनी केला होता. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार सुरु असल्याचे पुरावे सादर केले आहेत. भुजबळ व कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध फोटो व पुरावे देत सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे 

भुजबळांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कांदे यांनी केला आहे. पुढे बोलताना कांदे म्हणाले,  नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील भुजबळांचे  (Chhagan Bhujbal) निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा आरक्षणावेळी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले. आता महायुतीच्या उमेदवार असलेल्यांसाठी मेळावे घ्यावे व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा , असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. 

छगन भुजबळांच्या परिपत्रकावर शरद पवारांचा फोटो 

दरम्यान, सुहास कांदे यांच्या आरोपाचे खंडन करणारे एक पत्र आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी काढले. मात्र त्या पत्रावर देखील शरद पवार व भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा एकत्रित फोटो असल्याने हे कसले संकेत म्हणायचे? असा सवालही कांदे यांनी उपस्थित केला. सुहास कांदेंच्या आरोपांमुळे महायुतीत वाद सुरु होण्याची शक्यता आहे. शिवाय यापूर्वीही छगन भुजबळ यांनी ठाकरे-पवारांना सहानुभूती आहे, असे म्हणत महायुतीला अडचणीत आणल्याची चर्चा आहे. 

दिंडोरीत भास्कर भगरें वि. भारती पवार 

महायुतीने दिंडोरी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांना मैदानात उतरवले आहे. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. भास्कर भगरेंनी सरपंचपदापासून आपला प्रवास सुरु केला आहे. ते पंचायत समितीचे सदस्य देखील होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या परिषद देखील लढवली होती. सध्या ते राष्ट्रवादीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते, शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

Ajit Pawar : अरे मंत्री व्हायला निघालाय, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, अजितदादांचे शरद पवारांच्या आमदाराला चॅलेंज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावाBajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणेएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget