Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणतात, "राऊत यांना 'मातोश्री' डळमळीत करायची आहे
रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परबांना संपादक करा.
Chandrakant Patil : राज्यात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रश्मी ठाकरेंच्या (Rashmi thackeray) 19 बंगल्याचा विषय विनाकारण आणला. राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे आणि ते कुणाच्या सांगण्यावरून वागतात हे जगजाहीर आहे असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सोबतच त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
अनिल परबांना संपादक करा.
रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परबांना संपादक करा. सामना मध्ये कशी भाषा वापरली जाते ते आपण पाहतोच असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नारायण राणे जर काही बोलले असतील तर...
राज्यात सध्या जे काही चाललय त्याबाबत अँक्शन ला रिएक्शन होतच राहणार असे म्हणावे लागेल. सगळ्यांना कोणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाहीए. अशावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं. पण ते कसे बोलवणार? नारायण राणे जर काही बोलले असतील तर ते केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे काहीतरी ठोस माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. असे पाटील म्हणाले
काँग्रेस आणि सेनेला कठपुतली सारखे नाचवणारे कोण?
राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे आणि ते कुणाच्या सांगण्यावरून वागतात हे जगजाहीर आहे. जे महाविकास आघाडीचे कर्तेकरविते आहेत ते सगळ्यांना काँग्रेस आणि सेनेला कठपुतली सारख नाचवते आहेत असे सांगत नाव न घेता शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
पोलीस महासंचालक बदल
या राज्य सरकारने एकही निर्णय घेतलेला नाही. त्यांना वारंवार कोर्टाचे फटके खावे लागत आहेत, तरीही समजत नाही असे पाटील म्हणाले.
सोमय्या-राऊत वाद शिगेला