भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुप्तहेराला पकडलं; केसीआर सरकारने असं का केलं? भाजपचा सवाल
BJP National Executive Committee Meeting: हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती. येथे भाजपने राज्य सरकारच्या गुप्तहेराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
![भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुप्तहेराला पकडलं; केसीआर सरकारने असं का केलं? भाजपचा सवाल Caught spying at BJP national executive meeting; Why did the KCR government do that? BJP's question भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुप्तहेराला पकडलं; केसीआर सरकारने असं का केलं? भाजपचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/a6c892acf8ee0cc9f3c3fb93323a3e95_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BJP National Executive Committee Meeting: हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती. येथे भाजपने राज्य सरकारच्या गुप्तहेराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बैठकीदरम्यान काही कागदपत्रांची छायाचित्रे क्लिक करताना या गुप्तचर अधिकाऱ्याला (Intelligence Officer) पकडण्यात आल्याचा आरोप आहे.
एबीपी न्यूजचे वार्ताहर नीरज पांडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लोक जेव्हा जेवायला गेले होते, त्यावेळी हा अधिकारी काही कागदपत्रांची तपासणी करत होता. यावेळी तेथे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चौकशी केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तेलंगणा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
भाजप कार्यकर्त्यांनी फोटो डिलीट केले
भाजपच्या तेलंगणा युनिटच्या एका वरिष्ठ नेत्याने देखील बैठकीच्या कार्यवाहीदरम्यान एका गुप्तचर अधिकाऱ्याला अटक केल्याची माहिती दिली आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार एन. इंद्रसेन रेड्डी यांनी सांगितले की, त्यांनी गुप्तचर अधिकाऱ्याला त्यांच्या वरिष्ठांकडे सोपवले आणि त्यांनी क्लिक केलेले फोटो डिलीट केले. रेड्डी यांनी एचआयसीसीच्या बाहेर पत्रकारांना सांगितले की, स्थानिक सरकार दुर्भावनापूर्ण हेतूने येथे होत असलेली संभाषणे सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर अधिकारी प्रेक्षागृहाच्या आत आले होते, जेथे प्रवेशाची परवानगी नव्हती. त्यांनी घटनास्थळी जाण्यासाठी पोलिस पासचा वापर केला.
राज्य सरकारची ही वृत्ती आम्हाला मान्य नसून त्यांनी इतरांच्या गोपनीयतेचा भंग करू नये, असे भाजप नेते म्हणाले. त्यांनी प्रश्न विचारला की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुप्तचर अधिकारी का पाठवले? काही असेल तर त्यांनी पुढे येऊन त्याला सामोरे जावे. या घटनेबद्दल राज्य सरकारने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पोलिसांना या घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)