Maharashtra Politics NCP : शिवसेना बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर प्रवेश; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जामीन
Maharashtra Politics NCP : शिवसेना बंडखोर आमदार वास्तव्य करत असलेल्या हॉटेलमध्ये बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
Maharashtra Politics NCP : बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवसेनेचे बंडखोर आमदार असणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गोवा पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना रविवारी कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. सोनिया दोहान आणि श्रेय कोटी हाल अशी त्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही पदाधिकारी मागच्या दोन दिवसापासून पणजीतील ताश कन्वेंशन सेंटर मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होते. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदारही वास्तव्यास होते. हेरागिरी व तोतियागिरी केल्याचा आरोप ठेवत या दोघांनाही पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अटक करण्यात आली. आज कोर्टात हजर केला असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. वीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची हॉटेलकडून तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पणजी पोलिसांनी ही कारवाई केली होती.
दुहान यांनी हॉटेल मध्ये घुसून बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी केली. शिवसेनेचे बंडखोर आमदार शनिवारी रात्री मुंबईत परतले. गुवाहाटीमधून या आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. गुवाहाटीप्रमाणे गोव्यातही बंडखोर आमदारांसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात होती.
कोण आहेत सोनिया दुहान
सोनिया धुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. वर्ष 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोनिया धुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुपपणे सुटका केली होती. त्यामुळे सोनिया धुहान यांनी गोव्यातही हाच प्रयत्न केला होता का, याची चर्चा सुरू झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: