एक्स्प्लोर

'टीआरएसच्या 20 ते 30 आमदारांना खरेदी करण्याचा भाजपने प्रयत्न केला', तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा आरोप

KCR Remark over TRS MLAs Poaching case: तेलंगणाचे  (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपवर टीआरएस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

KCR Remark over TRS MLAs Poaching case: तेलंगणाचे  (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी भाजपवर (BJP) टीआरएस (TRS) आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री केसीआरच्या म्हणण्यानुसार, भाजपने टीआरएसच्या 20-30 आमदारांना आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न केला. एका सभेत केसीआर म्हणाले की, टीआरएस आमदारांना 100 कोटी रुपये देऊ केले होते.

तेलंगणामधील मुनुगोडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Manugode Bypoll) सभेला संबोधित करताना केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Modi) टीआरएस आमदारांची (TRS MLA) खरेदी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. केसीआर म्हणाले की, "मी नरेंद्र मोदींना विचारतो, ही क्रूरता का, तुम्हाला किती सत्ता हवी? तुम्ही याआधीही दोनदा निवडून आलात, मग सरकार का पाडताय? ज्यांनी मोदी आणि आरएसएससाठी काम केले, ज्यांनी आमच्या तेलंगणा सरकारविरुद्ध कट रचला ते मध्यवर्ती कारागृहात आहेत.

सभेत आमदारांना उपस्थित करताना केसीआर म्हणाले, "माझ्यासोबत चार आमदार हैदराबादहून मुनुगोडे येथे आले आहेत. हे माझे चार आमदार आहेत, ज्यांनी आमच्या सरकारच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या दिल्लीच्या सत्तेकरांचे करोडो रुपये नाकारले.'' केसीआर म्हणाले, "दिल्लीतील काही नेत्यांनी तेलंगणाचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यांना पक्ष सोडून सोबत येण्यास सांगितले. परंतु त्यांनी ते मान्य केले नाही आणि माझ्यासोबत आले.'' पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत केसीआर म्हणाले, "विश्वगुरु नाही, ते विष गुरु आहेत.''

दरम्याम, टीआरएसच्या चार आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 26 ऑक्टोबर रोजी चार टीआरएस आमदारांपैकी एक असलेल्या पी रोहित रेड्डी यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 आणि लाच देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा कुमार, रात रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा आणि सिंहयाजी स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरएस आमदार रोहित रेड्डी यांनी आरोप केला आहे की त्यांना 100 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि पुढील विधानसभा निवडणूक भाजप उमेदवार म्हणून लढण्यास सांगितले गेले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Embed widget