एक्स्प्लोर

"अंबादास दानवेंच्या शिवीने रात्रभर झोप लागली नाही", राजीनाम्याची मागणी घेऊन प्रसाद लाड एकटेच बसले आंदोलनाला!

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हीच मागणी घेऊन त्यांनी एकट्यानेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले. दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच आंदोलन करत होते. लाड यांच्या या भूमिकेनंतर आजचे विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं

"ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे.  याबद्दल मला उद्धव ठाकरेंनादेखील विचारायचे आहे.  मी स्वत: किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवे यांनी केला. आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत," अशा भावना लाड यांनी व्यक्त केल्या. 

आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे

तसेच "मी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलंय.  विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी माफी मागितली पाहिजे. शिक्षा एक दिवस असेल किंवा एक तासाची असेल. प्रश्न हा आहे की आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे.  उद्धव ठाकरेंनी देखील यासंदर्भात जाब त्यांना विचारायला पाहिजे," अशी मागणी लाड यांनी केली.

बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? अंबादास दानवेंची टीका 

अंबादास दानवे यांनी 1 जुलै रोजी विधिमंडळात लाड यांना उद्देशून शिवी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी दानवे यांनी यावर स्षष्टीकरण दिले होते. बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असं दावने म्हणाले. 

हेही वाचा :

Ambadas Danve : माझा तोल सुटलेला नाही, माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार, अंबादास दानवे आक्रमक

Ambadas Danve On Prasad Lad : राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन वाद; प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडले

Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget