BJP MLA on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न 15 दिवसांत निकाली काढा, भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीत मागणी
BJP MLA on Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात दिरंगाई नको. 15 दिवसांत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा", अशी मागणी भाजपच्या मराठा आमदारांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
BJP MLA on Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात दिरंगाई नको. 15 दिवसांत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा", अशी मागणी भाजपच्या मराठा आमदारांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आपण केलेली कामे मराठा समाजात अधिक आक्रमकपणे मांडा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आमदारांना दिल्या आहेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. भाजपच्या मराठा आमदारांची बैठक पार पडली. याबैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली आहे.
आपण प्रत्यक्षात केलेली कामे मराठा समाजापर्यंत अधिक आक्रमकपणे पोहोचवा
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आधी फडणवीस सरकार आणि आता शिंदे फडणवीस सरकार यांनी केलेली काम मराठा समाजापर्यंत पोहचवा, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं आणि टिकवल जाईल हे समाजापर्यंत पोहोचवा. आजवर आपण प्रत्यक्षात केलेली कामे मराठा समाजापर्यंत अधिक आक्रमकपणे पोहोचवा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले?
मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजात असंतोष आहे. खास करून भाजपच्या बाबतीत हा असंतोष दिसतोय. आम्ही काही कमी पडलोय का? योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहचली पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला आम्ही बळकटी दिली. सारथी मार्फत मराठा व कुणबी मुलांच्या शैक्षणिक कामासाठी मदत करणारी संस्था आहे. येत्या मंगळवाळपासून आम्ही पुन्हा बैठका घेतोय. लोकांपर्यंत नीट सर्व पोहचण्याचा व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमदारांना याबाबत अपग्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडून न येण्याच्या कारणांपैकी एक कारण हे मराठा समाजाची मते न मिळणे हे आहे, असंही चंद्रकांत पाटील यांना सांगितलं.
LIVE | मुंबई येथे पत्रकारांशी संवाद
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) June 14, 2024
• Youtube Link -https://t.co/ArFYHO1HyD
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar on RSS : आरएसएसने म्हटलं राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता अजितदादा म्हणाले...