'मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा...'; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ अन् सुषमा अंधारेंची जुंपली
ठाकरे गटाने जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.
शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही , चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सु सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपवर प्रत्युत्तर दिलं होतं. सुषमा अंधारेंच्या या विधानावर आता चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी काय बघते, काय बघत नाही...
मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा मी विचारलेला प्रश्न खरा आहे की खोटा ते सांगा, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच उबाठ्याच्या दिवट्यांवर बोलल्यानंतर अंधारातील सटरफटर चिलटं फडफडतात. मला काहीही बोला, पण तो ऍक्टर पॉर्न स्टार आहे की नाही ते सांगा, असं चित्रा वाघ यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ज्यांच्या मांडीवर बसले त्यांचे सरकार कर्नाटकात आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही , चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
तसेच, कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. या ऍपवर जाणारे प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझ याच ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरातील सर्व राजरीय पक्ष विविध मुद्द्यांवर जाहिरात करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही विविध जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याच जाहिरातीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराच्या संबंधीत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदत घेत ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
संबंधित बातमी:
20 लाखांहून अधिक ग्राहक, IPO साठी अर्जही दाखल; चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेला Ullu App आहे तरी काय?