एक्स्प्लोर

Sanjay Raut : निवडणुकीसाठी सारा खेळ? देशभरात दंगली भाजपनं घडवल्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : देशात दंगलींना सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. भाजपला देशातील जनतेचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त दंगलीचं राजकारण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशभरात सुरु झालेल्या दंगली आणि हिंसाचारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपककडून देशात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 'देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत हे देशातील सत्ताधारी पक्ष भाजपने प्रायोजिक केले आहेत. याआधीही जनतेनं रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण साजरे केले आहेत. तेव्हा दंगली झाल्या नाहीत. दिल्ली हे राज्य केंद्रशासित आहेत. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे', असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून तिथे दंगे सुरु आहेत. याचं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुका आहे. निवडणुकांवर भाजपचं लक्ष्य आहे. आधी भाजपनं पराभवाच्या भीतीने निवडणुकांच्या तारखा बदलल्या. आता हातून महापालिका गेली, असं वाटत असताना भाजपकडून दंगे सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. मुंबईमध्ये भोंग्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, व्यापार उद्योग याला मोठा धक्का बसला आहे.'

कोरोनानंतर आता कुठे अर्थ व्यवस्था सुरळीत होतेय, मात्र काही लोकं उगाच अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. 'कोरोनानंतर आता लोकांना रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. लोक आता कुठे काम धंद्याला लागली असून त्यांच्या घरी चुली पेटत आहेत. उद्योगपती आणि व्यापारी धक्क्यातून सावरत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. मात्र, परत दंगे घडवायचं काम सुरु आहे. याचा परिणा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय गुंतवणुकीवर होत आहे.', असं राऊत म्हणाले आहेत.

देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे देशातील उद्योगपती या शहरांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. मजूरवर्गही या शहरांमध्ये राहण्यास तयार नाही. असे अनेक प्रश्न या दंगलींमुळे निर्माण झाले आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. त्यांना या देशाचं, या देशातील जनतेचं, शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त दंगलीचं राजकारण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget