Coronavirus New Cases : दिलासादायक! नवीन रुग्णांमध्ये 43 टक्के घट, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण
Coronavirus New Cases in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी भारतात कोरोनाचे 2183 नवीन रुग्ण आढळले होते.
Coronavirus New Cases in India : देशातील कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1247 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल 2183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 214 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 966 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 928 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 966 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 11 हजार 701 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.
India reports 1,247 new COVID19 cases today; Active caseload at 11,860 pic.twitter.com/iRrSTTNb6R
— ANI (@ANI) April 19, 2022
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशात 16 लाख 89 हजार 995 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 72 लाख 15 हजार 865 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus : दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच, नव्या रुग्णांची संख्या 500 पार
- Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व...
- Amway Money Laundering : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Amarnath : अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट, टीआरएफ संघटनेची धमकी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha