Chitra Wagh : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरले, बारामतीच्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं; काय म्हणाल्या चित्रा वाघ?
Chitra Wagh On Supriya Sule : या वयातही शरद पवारांना मैदानात उतरावं लागतंय, जिल्हा आणि तालुके फिरायला लागतात, यावरून सुप्रिया सुळे कुचकामी ठरल्याचं दिसतंय अशी टीक भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय.
![Chitra Wagh : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरले, बारामतीच्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं; काय म्हणाल्या चित्रा वाघ? bjp chitra wagh slams supriya sule ncp sharad pawar on baramati lok sabha election sunetra ajit pawar kolhapur maharashtra politics marathi news Chitra Wagh : शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरले, बारामतीच्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं; काय म्हणाल्या चित्रा वाघ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/10cc204f05db53a3c5b1075c5b4db012170981749510493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: बारामतीच्या मोठ्या ताईंचे (Supriya Sule) मनस्वास्थ बिघडले आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं दिसतंय असा टोला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला आहे. तसेच शदर पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरल्याचं त्या म्हणाल्या. बारामतीमध्ये अजित पवारांचं काम प्रचंड आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चित्रा वाघ कोल्हापुरात बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, अजित पवारांचे प्रचंड काम आहे, विकासकामाचे प्रचंड व्यासंग असलेले नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे. त्यांनी बारामतीमध्ये केलेली विकासकामं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर सुनेत्रा पवार या निवडून येतील.
शरद पवारांच्या आजूबाजूचे कुचकामी ठरले
चित्रा वाघ म्हणाल्या की, माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप वाईट वाटते. शरद पवारांच्या भोवती आता असणारी फळी कुचकामी ठरली. या वयातसुद्धा नेत्याला मैदानात उतरावे लागते, जिल्ह्यामध्ये फिरावे लागते आणि तालुक्यामध्ये लक्ष घालावे लागते यासारखं वाईट काही नसावे. शरद पवारांनी ज्यांना मोठे केले आणि त्यांच्या अवतीभवती असणारे सर्वच कुचकामी ठरले. एवढ्या मोठ्या ताईंना त्यांचे राजकीय करियर सावरायला लागत आहे.
शब्दांचे पोकळ बाण सोडणे हेच विरोधकांचे काम
जागावाटपावरून महाविकास आघाडीवर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या, यांच्या घराला आग लागली पण महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत. महाविकास आघाडीचे नेते काही बोलतायत, त्यात काही तथ्य नाही. जे होणार ते देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने करतील असा आम्हाला विश्वास आहे. रोज सकाळी यायचं आणि तुतारी वाजवायची, मीडिया हेच विरोधकांचे कुरुक्षेत्र झाले आहे. शब्दाचे पोकळ बाण सोडणे एवढंच त्यांचे कामं आहे. फिल्डवर येऊन जर वस्तूस्थिती पहिली तर त्यांच्या वलग्ना बंद होतील.
देवेंद्र फडणवीस-रामदास कदमांचा चांगला समन्वय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे. फडणवीसांनी दीड वर्षात महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याचे कामं केले आहे. दोघांमधील समज आणि विश्वास अत्यंत चांगला आहे. दोघांची घट्ट महायुती आहे, काही वादळे येतात आणि जातात. पण हे दोघेही नेते आपल्या नेत्यांशी संवाद साधायला सक्षम आहेत आणि मला यात काही वेगळं वाटतं नाही. योगेश कदम चांगल्या मतांनी निवडून येतील असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)