भाजप उमेदवारच पॉर्नस्टार, वाघांनी Ullu ॲप काढलं तर, शिवसेनेनं सेक्स स्कँडल दाखवलं; महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली
शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
मुंबई : कर्नाटकमधील माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याच्या सेक्स स्कँलडचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) चांगलाच तापला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचा सुपुत्र असल्याने इंडिया आघाडीकडून प्रज्जल रेवण्णा प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकचे (karnatak) मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशाबाहेर फरार झालेल्या प्रज्वल रेवण्णाला भारतात आणण्याची मागणी केली आहे. आता, महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी शिवसेनेच्या जाहिरातींचा उल्लेख करताना A प्रमाणित असलेल्या उल्लू अॅपचा दाखला दिला. आता, शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
शिवसेना उबाठा पक्षाने महिला अत्याचारासंदर्भाने एक जाहिरात निवडणूक कॅम्पेनिंगचा भाग म्हणून प्रसिद्ध केली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या जाहिरातीचा दाखल देत शिवसेना उबाठा व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. महिला अत्याचाराच्या संबंधी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. मग, अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आता, वाघ यांच्या विधानावरुन शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पलटवार केला आहे.
प्रज्वल रेवण्णा यांच्या आजोबांचा पक्ष असलेला जनता दल सेक्युलर हा लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीत आहे. त्यामुळे, भाजपसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरत असून थेट मोदी-शाह यांना उद्देशून इंडिया आघाडीकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे HDव्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या.
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 2, 2024
त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या & सांगितल्या चाकरीच्या आहेत.@ShivSenaUBT_
सुषमा अंधारेंचाही पलटलवार
आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना आरसा दाखवण्याचं काम केलंय. तर, प्रियंका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
लाज वाटू द्या, बुडून मरा
जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबातीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा... अशा तीव्र संतापजनक शब्दात प्रियंका चुतर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.