एक्स्प्लोर

प्रीतम मुंडेंसाठी आग्रही असलेल्या पंकजा मुंडेंना बीडचं तिकीट, पुण्यात मुरलीधर मोहोळ मैदानात, भाजपचा गेमप्लॅन काय?

BJP Candidate List : बीडमधून प्रीतम मुंडे आग्रही असताना भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले आहे. तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात असतील. 

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे आग्रही असताना भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आले आहे. तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात असतील. 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी (BJP candidate list) जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.

प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी

भाजपनं बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारली आहे. मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. बीडच्या जागेवर प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. त्यामुळेच भाजपच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर भाजपने पंकजा मुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या मातब्बर नेत्या आहेत. प्रीतम मुंडे यांच्या पेक्षा पंकजा मुंडे गेल्या काही काळात अधिक पसंती मिळत असल्याने भाजप पक्षाश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आता रंगली आहे. 

पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते लोकसभेचे संकेत

येत्या चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. अशातच आता त्यांचं नाव जाहीर झालं आहे.

पुण्यातून मुरलीधर मोहोळ रिंगणात

तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत होती . निवडणुकीच्या आधीच मेधा कुलकर्णींना राज्यसभेच्या खासदार बनवून हक्काचा ब्राह्मण मतदार नाराज होणार नाही याची भाजपने काळजी घेतली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदार संघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शहांनीदेखील यांनीदेखील मतदार संघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रीयपणे सहभागी होते. त्यासोबतच पुणे आणि आजुबाजूच्या गावांमध्येही भाजपची ताकद आहे, त्यामुळे भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? 

पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू होती. मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन की लोकसभा उमेदवार म्हणून मला संधी दिली. देशाचे प्रधानमंत्री, अमित शाहजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे आभारी आहे. 

व्यक्ती म्हणून माझं नाव आलं असलं तरी पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेता करतो.  १९९२-९३ साली अध्यक्ष होतो. लोक प्रतिनिधी म्हणून काम केलं. महापौर म्हणून काम केलं, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. सांस्कृतिक जडणघडण, शहराचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मोदींनी केलेलं काम, स्वप्नात असलेली मेट्रो सुरू झाली, चांदणी चौक प्रकल्प अनेक गोष्टी भाजपकडून मिळाल्या. पुन्हा एकदा खासदार हा पुण्याचा महायुतीचा, त्याला मत देईन, मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

BJP Candidate List : मुंबईतील दोन, एकूण 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं, भाजपची रणनीती यशस्वी ठरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget