Sharad Pawar: शरद पवारांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या चर्चेदरम्यान मोठी अपडेट, 2 ते 6 सप्टेंबरचा दौरा 'झेड प्लस' सुरक्षेतच होणार
Sharad Pawar: 'झेड प्लस' सुरक्षेवरून राज्यासह देशभरात वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना मात्र, खुद्द शरद पवार यांचा महाराष्ट्रात होणारा 2 ते 6 सप्टेंबर या काळातील दौरा 'झेड प्लस' सुरक्षेसह पार पडणार असल्याची माहिती आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'झेड प्लस' सुरक्षेवरून राज्यासह देशभरात वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना मात्र, खुद्द शरद पवार यांचा महाराष्ट्रात होणारा 2 ते 6 सप्टेंबर या काळातील दौरा 'झेड प्लस' सुरक्षेसह पार पडणार असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'झेड प्लस' सुरक्षा व्यवस्थेबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्याची (30 ऑक्टोबर) दिल्लीतील शरद पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृह खात्याचे अधिकारी, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी, दिल्ली पोलिस, वाहतूक पोलिस शाखा, अग्निशमन दल, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि दिल्ली महापालिका यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सहभागी होते. या बैठकीमध्ये झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना माहिती देण्यात आली. तसेच या सुरक्षेसंदर्भात काही सूचना देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्या कारणामुळे ही सुरक्षा दिली जात आहे, याचा तपशील देखील सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला नसल्याचे पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यासंबधीचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
दरम्यान सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षा दलाच्या ताफ्याची तैनात निवासस्थानाच्या आतमध्ये करण्यात येऊ नये, सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार आपले खासगी वाहन बदलले जाणार नाही. वाहनामध्ये देखील दोन सुरक्षारक्षक नेमले जाऊ नये असे देखील पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाच्या कुंपणाच्या भिंतीची उंची वाढवण्याची आवश्यकता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी पाहणी देखील करण्यात आली होती.
माध्यमांत उलट-सुलट चर्चा
दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात असलेले स्थान, त्याचबरोबर महाराष्ट्रात काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुका, राज्यातील आरक्षणाची स्थिती, गेल्या काही दिवसांंध्ये सुरू असलेले प्रकार या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुरक्षा व्यवस्था स्वीकारली की नाकारली याबाबतची उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली होती. परंतु, शरद पवार यांचा 2 ते 6 सप्टेंबर या काळात होणारा मुंबई ते कोल्हापूर दौरा 'झेड प्लस' सुरक्षा कवचाखाली होणार आहे.
शरद पवारांनी कोणत्या अटी-शर्थी ठेवल्या?
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र गुप्त ठेवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शरद पवारांसोबत 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्ट मध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना (Sharad Pawar) करण्यात आला आहे. परंतु, शरद पवारांना यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, घराच्या आतमध्ये सुरक्षाकडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, शरद पवारांसह (Sharad Pawar) देशातील इतर अजून तीन व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याबाबत गृहखात्याच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच, शरद पवारांच्या सुरक्षेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अहवाल सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
केंद्रानं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना संशय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत.