एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी महापौरचा सपत्नीक शिवसेनेत पक्षप्रवेश 

Shivsena UBT : उद्धव ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. छ. संभाजीनगरचे माजी महापौर नंदुकुमार घोडले आणि त्यांची पत्नी यांनी शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय.

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हालचालींना वेग आला आहे, एकीकडे शिवसेना (Shivsena UBT) ठाकरे गटाकडून सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. छ. संभाजीनगरचे माजी महापौर नंदुकुमार घोडले आणि त्यांची पत्नी यांनी शिवसेना (Shivsena UBT) ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत ठाकरेगटाचा रामराम ठोकला आहे. तर नंदुकुमार घोडले आणि त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार आजच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.

दरम्यान, पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची (former corporators) आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक (former corporators) पबाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हकालपट्टी केलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षांतरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

महानगरपलिका निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा धक्का

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं, त्यानंतर आता महानगर पलिकेच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांनी आधीच कारवाई केल्याची माहिती आहे. पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. 5 जानेवारीला मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत. मागील दोन - तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच बदलाचे वारे दिसून येत आहे. या दरम्यान राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान या निवडणुकीवेळी इनकमिंग होण्याची आणि मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी (Rajan Salvi) हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चांना उधाण आले होते. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राजन साळवी जर आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे वक्तव्य केले होते. आता यावर खुद्द राजन साळवी यांनी नुकतीच  आपली भूमिका स्पष्ट केली होती.   

यावेळी राजन साळवी म्हणाले की, पराभवाच्या वेदना आहेत. मला तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे. मात्र या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदार संघात काम करत आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन, मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा 

Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Embed widget