Bharat Jodo Yatra: भारत जोडो की सीट जोडो? सीपीएमच्या ट्वीटला काँग्रेसने दिलं जोरदार प्रत्युत्तर
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचं नेतृत्व करत असून यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होत आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचं नेतृत्व करत असून यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होत आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेवर भाजप हल्लाबोल होत असतानाच आता यात सीपीएमनेही उडी घेतली आहे. केरळमधून जाणाऱ्या राहुल गांधींच्या पदयात्रेची खिल्ली उडवत सीपीएमने प्रश्न उपस्थित केला आहे की, जर राहुल गांधींना भाजप-आरएसएसशी लढायचे असेल तर केरळमध्ये एवढ्या लांबच्या प्रवासाचा अर्थ काय? काँग्रेसनेही यावर आता प्रत्युत्तर दिलं आहे.
सीपीएमने राहुल गांधींचे एक व्यंगचित्र ट्वीट केले आहे. ज्यावर लिहिले आहे की, "भारत जोडो की सीट जोडो? केरळमध्ये 18 दिवस, यूपीमध्ये 2 दिवस, भाजप-आरएसएसशी लढण्याचा विचित्र मार्ग." चित्रात केरळचा नकाशा लाल रंगात दाखवला आहे आणि यूपीचा नकाशा भगव्या रंगात दाखवला आहे. याला उत्तर देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सीपीएमची टीका मूर्खपणाची असल्याचे म्हटले आहे.
— CPI (M) (@cpimspeak) September 12, 2022
यात्रेचे नियोजन कसे केले पाहिजे याचा अभ्यास सीपीएम करायला हवा असे जयराम रमेश म्हणाले आहेत. जयराम यांनी केरळमधील सीपीएमला भाजपची ए टीम असल्याचं म्हणत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मुंडू मोदी म्हटले आहे. केरळमध्ये धोतीसारख्या कपड्याला मुंडू म्हणतात. अनेक राजकीय समीक्षक मुख्यमंत्री विजयन यांच्या स्टाईलची तुलना पंतप्रधान मोदींशी करतात आणि त्यांना मुंडू घातलेले मोदी म्हणतात.
Do your homework better on how and why yatra was planned the way it is. And silly criticism from a party that is the A team of BJP in the land of MunduModi. https://t.co/xku8ROd9XZ
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 12, 2022
दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडी यात्रा सध्या केरळमधून जात आहे. येथे सीपीएम सत्तेत आहे आणि काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. आपल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी केवळ देशाचे मुद्दे उपस्थित करून मोदी सरकारवर निशाणा साधत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. याच्या एक दिवस अगोदरच केरळ प्रशासनाने राहुल गांधींच्या पदयात्रेतील रात्रीच्या मुक्कामाची परवानगी रद्द केली होती. यावर वाद न घालता काँग्रेसने शांतपणे जागा मुक्कामाची जागा बदली. असं असलं तरी यात गंमत म्हणजे बंगालमध्ये सीपीएम आणि काँग्रेसने गेल्या दोन विधानसभा निवडणुका युतीने लढल्या आहेत.