एक्स्प्लोर

निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल

Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या लढत होत आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना थेट सवाल केलाय.

बीड : राज्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha Seat) होय. बीडमध्ये यंदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) लोकसभेच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे (Bajarang Sonwane) निवडणूक लढवत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होत आहे. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना एक प्रश्न विचारला आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना  2019 च्या विधानसभा निवडणुकीत का पराभव स्वीकारावा लागला होता, असा प्रश्न विचारला आहे. 

पंकजा मुंडेंना जनतेनं घरी का बसवलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदूर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी केला. 

आजी माजी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे.ताई साहेब तुम्ही एवढा निधी आणलाय म्हणताय तर 2019 ला लोकांनी तुम्हाला का घरी बसवलं, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. परळीतील मतदार शरद पवारांना माणणारा असल्यानं तुम्हाला घरी बसावं लागलं, असं सोनवणे म्हणाले. 

परळी मतदारसंघातील लोक हे शरद पवार यांच्या विचाराला मानणारे असून सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही बोलण्याचा कडब्याच्या पेंडीचा आळा ज्या प्रमाणं सुटतो तसा सुटला आहे, त्यामुळे त्यांनी विचार करून बोलावं असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले. 

पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये होत्या का? सोनवणेंचा सवाल

बजरंग सोनवणे यांनी 30 एप्रिलला आष्टी तालुक्यातल्या बीड सांगवी या गावात प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी बीड सांगवी गावात बजरंग सोनवणे यांचा जंगी स्वागत करण्यात आलं होतं.  बजरंग सोनवणे यांनी त्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. धनंजय मुंडे भाषणातून सांगतात पंकजा मुंडे खासदार झाल्यावर बीड जिल्ह्याचा विकास करतील मग गेल्या दहा वर्ष पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये होत्या का त्यांना विकास का करता आला नाही, अशी टीका बजरंग सोनवणे यांनी केली होती.

बजरंग सोनवणे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन प्रीतम मुंडे यांच्याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले होते. प्रीतम मुंडे खासदार असताना त्यांनी धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षणावर सभागृहात एकदाही आवाज उठवला नाही असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर देखील टीका केली होती. धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा स्तर आता घसरत असल्याचं देखील ते म्हणाले होते.  

संबंधित बातम्या : 

बीडमध्येच जातीपातीचं राजकारण का?; धनुभाऊंचा उद्विग्न सवाल, पंकजांकडूनही खंत

सुभाष भामरेंपेक्षा शोभा बच्छाव अधिक श्रीमंत, धुळ्यातील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Tawde: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Embed widget