तुम्ही राजीनामा कधी देता? विधानसभा निवडणुकीपूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडेंना काँग्रेसचा सवाल, बीडमध्ये राजकीय घटनांना वेग
ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्यापेक्षा विरोधन विरोधकांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढावा असा आव्हान कृषी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलं होतं.
Beed: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात काँग्रेस सध्या चांगलीच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. 23 तारखेला परळीत शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार असून त्या विरोधात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत असून दोघांमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्यापेक्षा विरोधकांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढावा असा आव्हान कृषी मंत्र्यांनी केल्यानंतर काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी कुणाला चौधरी यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शेतकरी आत्महत्यासाठी मजबूर होतात, तुम्ही राजीनामा कधी देता असा सवाल चौधरी यांनी केलाय?
राज्य सरकारने मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यावे
'विकत घेतलेला सरकारचे विकत घेतलेले धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5000 क्विंटल दर होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्य सरकारने मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यावं', असं म्हणत काँग्रेस कमिटीचे सहभागी कुणाल चौधरी यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं.
तुम्ही राजीनामा कधी देता? कृषिमंत्र्यांना सवाल
कृषिमंत्र्यांनी चॅलेंज न देता शेतकरी लुटला का जातो? शेतकरी आत्महत्या साठी का मजबूर होत आहेत? हे सगळं होत असताना तुम्ही राजीनामा कधी देता असे सवाल चौधरी यांनी उपस्थित केले आहेत. ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्यापेक्षा विरोधन विरोधकांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढावा असा आव्हान कृषी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलं होतं. यालाच काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी कोणाला चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’
राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या तोंडावर घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह पक्षातील स्थानिक विरोधकांनी मोट बांधल्याचं दिसून आलं. सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष समिती’ हा एक मंच स्थापन केला आहे. या मंचच्या माध्यमातून पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परळीत येत्या २३ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर, बैलगाडीसह ‘शेतकरी हक्क मोर्चा’ काढण्यात येणार आहे.