एक्स्प्लोर

बारामतीत पैशांचा पाऊस, मध्यरात्र उलटूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज सुरु, रोहित पवारांचा अजितदादा मित्रमंडळावर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election : भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.  पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.

पुणे : बारामतीत (Baramati Lok Sabha Election)  विरोधकांकडून मतदाराना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी (Rohit Pawar)  एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय. 

भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.  पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.  ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.  तणावातून वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले.

  घडलेल्या प्रकरानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.    संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एवढ्या मध्यरात्री  गावात तुमचे काम काय आहे? अशी ग्रामस्थांकडून विचारणा देखील करण्यात आली आहे.

 तसेच वेल्हेतील  जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री 12 वाजले तरी बँक सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत, असे म्हणत रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. रात्री 12 वाजता बँका सुरू असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आहे.  

आज बारामतीमध्ये मतदान होणार आहे. तत्पूर्वी  5 मे रोजी  संध्याकाळी 5 वाजल्यापासून येथील प्रचार थांबलाआहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी बारामतीत थेट लढत आहे.

बारामतीचं राजकीय वातावरण तापलं

राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे यंदा बारामतीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.बारामती हा पवारांचा बालोकिल्ला आहे.  राष्ट्रवादी फुटल्यामुळे यंदा बारामतीत काका आणि पुतण्या आमने-सामने उभे ठाकले आहेत.  आपल्या लेकीच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठीबारामतीमध्ये शरद पवार  तसेच संपूर्ण पवार कुटुंबीय  सर्वस्व झोकून सभा घेताना दिसले. आता बारामतीचा मतदार कौल कोणाला देणार हे आता 4 जूनला स्पष्ट होणार आहे. 

हे ही वाचा :

Lok Sabha Election 2024 : शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बारामती...!

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे, शरद पवारांच्या आमदाराचा पलटवार, जयकुमार गोरेंना टोला
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
T20 World Cup 2026: आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंडची एंट्री होणार
आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी खेळणार
Embed widget