एक्स्प्लोर

Baba Jagtap Kurdu Murum Case: गायछाप मिळायचे वांदे, ई-सिगारेट कुठून आणू?; IPS अंजना कृष्णा यांना अजितदादांचा फोन जोडून देणारे बाबा जगतापांचा सवाल

Baba Jagtap Kurdu Murum Case: अजितदादा सर्वसामान्यांचे फोन थेट उचलतात. त्यामुळे त्या दिवशी मीच अजितदादांना फोन लावून अंजना कृष्णा यांना दिला होता, असं बाबा जगताप म्हणाले.

Baba Jagtap Kurdu Murum Case सोलापूर: माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन (Kurdu Murum Case) होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. यानंतर अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आता अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या बाबा जगताप एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

बाबा जगताप काय म्हणाले?

अजितदादा सर्वसामान्यांचे फोन थेट उचलतात. त्यामुळे त्या दिवशी मीच अजितदादांना फोन लावून अंजना कृष्णा यांना दिला होता, असं बाबा जगताप म्हणाले. याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कॉन्फरन्स कॉलवर अजितदादांना जोडून दिल्याची माहिती पूर्णपणे चुकीचे आहे. काल कुर्डूवाडी पोलिसांनी देखील याचा सविस्तर तपास केला होता, अशी माहिती बाबा जगताप यांनी दिली.

आमच्या गावात गायछाप मिळायचे वांदे-

मी नशा करतानाचा व्हिडीओ हा एआय तंत्रज्ञानाने मला बदनाम करण्यासाठी बनवला आहे. दोन वर्षांपूर्वी कोविडच्या काळात आणि ज्या ठिकाणी सेंटर चालवत होतो तेथे मी स्प्राईट येत असताना स्प्राईटची बाटली काढून तिथे चिलीम लावून मला बदनाम केलं आहे, असा दावाही बाबा जगताप यांनी केला. तसेच अंजली दमानिया यांनी मी ई-सिगारेट ओढत असल्याचा आरोप केलाय. आमच्या गावात गायछाप मिळायचे वांदे, ती लवकर मिळत नाही आणि अंजलीताई ई-सिगारेटचं बोलाताय...ई-सिगारेट काय असते, ते आम्हाला अंजली दमानियांनी म्हटल्यावर समजले, असंही बाबा जगताप म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की, डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे अजित पवार सांगताना दिसतात. 

कुर्डू गावातील मुरूम उपसा बेकायदेशीरच-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सदर प्रकरणाची दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन पानी अहवाल पाठवला आहे. यात कुर्डूतील मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. अहवालात म्हटले आहे की, 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी गाव हद्दीतील गट क्रं. ५७५/ १ या जमिनीत सुरू असलेल्या मुरूम उपशाची चौकशी व पाहणीसाठी गेले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणला. तेथील पंचनाम्यात ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरूम उत्खनन केल्याचे आढळले. मुरूम उत्खनन हे कुर्डू  -शिराळ पाणंद रस्ता व कुर्डू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरूम उपसा केल्याचे सांगितले. या कामासाठी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता जा. क्र./प.स.कु/ ४५/२०२४ (दि-१४ / १०/ २०२४) याच्या कामकाजास मुदतवाढ नसल्याचे सांगितले. त्यांनी हे काम 14 ऑक्टोबर 2024 मधील होते. तेव्हापासून सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमून होते, ते न केल्यास काम रद्द करण्याचे नमूद होते. 

कुर्डू गावातून त्या दिवशी बाबा जगताप यांनी लावला होता अजितदादांना फोन, VIDEO:

संबंधित बातमी:

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: मै अ‍ॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग तुम्हारी..., दादा भडकले; अजित पवारांना नडणाऱ्या अंजली कृष्णा कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातील तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Embed widget