एक्स्प्लोर

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: मै अ‍ॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग तुम्हारी..., दादा भडकले; अजित पवारांना नडणाऱ्या अंजली कृष्णा कोण?

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिस्तप्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दादागिरी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिस्तप्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दादागिरी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती.

कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांनी अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात. 

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या

2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर

3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी

4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत

5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी

6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण 

7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका

8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई 

9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

संबंधित बातमी:

Ajit Pawar: करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी दादांना ओळखलंच नाही; अजित पवार संतापले, म्हणाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Embed widget