एक्स्प्लोर

Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले

आधुनिक भगिरथ म्हणून या तालुक्यात ज्यांचा उल्लेख यापुढे होईल, ते आमदार सुरेश धस असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार धस यांच्या कामाचं कौतुक केलं.

बीड : आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं, त्यानंतर, भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांचं कौतुक करताना या तालुक्यातील आधुनिक भगिरथ असे म्हटले. दरम्यान, सुरेश धस यांनी भाषणावेळी फडणवीसांना चिठ्ठी आणून दिली. तर, ही चिठ्ठी 3 टीमएसीची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, यानिमित्ताने सरपंच परिषदेच्या लोकांनीही अनेक मागण्या माझ्याकडे केल्या आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. याप्रकरणी प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बीडकरांना दिला. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करुन स्वराज्याची निर्मित्ती केली. त्याप्रमाणेच सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या इथं नांदायचे आहे, आणि एक नवीन बीड आपण तयार करू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

आधुनिक भगिरथ म्हणून या तालुक्यात ज्यांचा उल्लेख यापुढे होईल, ते आमदार सुरेश धस असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार धस यांच्या कामाचं कौतुक केलं. कार्यक्रमाला उपस्थित लाडक्या बहि‍णींचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. एका महत्त्वाच्या कामाचं भूमीपूजन करण्यासाठी मी आज इथं आलोय. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला 23 टीएमसी पाणी मिळाला पाहिजे असा निर्णय झाला, पण दुर्दैवाने काही कारणास्तव केवळ 7 टीएमसी पाणी आपल्याला सापडलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय घेतला, पण केवळ 7 टीएमसीच पाणी असल्याचं दिसून आलं. त्यातच, आमदार सुरेश धस यांच्या मागणीनुसार महायुती सरकारने पहिली सुप्रमा आष्टीमधील या प्रकल्पाला दिली. तब्बल 11 हजार कोटी रुपयांची सुप्रमा या कामाला देण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले. धससाहेब, तुम्ही 2-3 टीएमसीचं मागणी करताय, पण 53 टीएमसी पाणी गोदावरीत आणण्यासाठी आपण काम करतोय, ते झालं तर मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही, दुष्काळ हा भूतकाळ होईल, असे फडणवीस यांनी म्हटले. 

दरम्यान, मराठवाड्यातील पाणी आणि सरकारचे प्रयत्न यावर बोलल्यानंतर भाषणाच्या शेवटी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी आणून दिली. त्यावेळी, सुरेश धस यांनी भाषणावेळी फडणवीसांना चिठ्ठी आणून दिली. तर, ही चिठ्ठी 3 टीमएसीची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, यानिमित्ताने सरपंच परिषदेच्या लोकांनीही अनेक मागण्या माझ्याकडे केल्या आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. याप्रकरणी प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बीडकरांना दिला.  तसेच, बीड जिल्ह्याला बड्या नेत्यांचा इतिहास आहे, तोच इतिहास आपल्याला पुढे न्यायचा आहे.  बीडचा गौरवशाली इतिहास तयार करण्याकरता आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा आहे, असे म्हणत फडवणीसांनी आपण नवीन बीड तयार करू, असे म्हटले. 

हेही वाचा

Video: ''मी जिवंत राहिल किंवा नाही राहील, पण...''; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सुरेश धसांची तुफान फटकेबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकंAaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाहीHarshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget